दिनांक 17 February 2020 वेळ 12:59 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » बोईसरमध्ये पावसाची दमदार हजेरी अनेक ठिकाणी पाणी साठल्याने नागरिकांचे हाल

बोईसरमध्ये पावसाची दमदार हजेरी अनेक ठिकाणी पाणी साठल्याने नागरिकांचे हाल

IMG-20180623-WA0016वार्ताहर
          दि. २download४ : पालघर जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बोईसरमधील अनेक ठिकाणी
नद्या नाले तुडुंब भरून वहात आहेत. पहाटेपासून सुरु झालेला पाऊस ५ ते ६ तास कोसळल्याने येथील सखोल भागात पाणी साचले आहे. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने व रस्त्यांवर पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. बोईसर- पालघर दरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साठल्याने रे
ल्वे सेवेवरही परिणाम झाला. लोकलश लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या. आज
रविवारीही बोईसरशी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला.

         शनिवारी बोईसरमध्ये १४२ मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. तारापूर हे गाव खाडीलगत असल्याने येथील अनेकांच्या
घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. तर बोईसर लोखंडी पाड्यामध्ये असलेल्या पुलावरून जोरदार पाणी वहात असल्याने दांडीपाड्याकडे जाणारा रस्ता बंद पडला होता. तारापूर एमआयडीसी व शिवाजी नगर भागात रस्त्यावर पाणी साठल्याने वाहनचालकांसह कामगारांना रस्तावरुन वाट काढणे मुश्किल झाले होते. पहिल्याच पावसात शहरातील सखोल भागासह जागोजागी पाणी भरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top