दिनांक 17 July 2018 वेळ 11:24 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » अतिवृष्टीमुळे आदिवासीचे घर कोसळले, भर पावसात घरातील आठ सदस्यांना झोपडीचा आसरा

अतिवृष्टीमुळे आदिवासीचे घर कोसळले, भर पावसात घरातील आठ सदस्यांना झोपडीचा आसरा

IMG-20180624-WA0045प्रतिनिधी
          मनोर,ता.२४ : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाट्यानजीकच्या कानल पाडा येथील लक्ष्मण झुनर यांचे घर आज झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळले.सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
          चिल्हार आवढाणी ग्रामपंचायत हद्दीत कानल पाडा येथे आदिवासी बहुल वस्ती आहे. लक्ष्मण जुनर यांनी २००४ साली येथे घर  बांधले होते. आज झालेल्या अतिवृष्टीमुळे घराचे प्रथम छप्पर कोसळले. आणि भिंतींना तडा गेल्या. घर कोसळताना घरात असलेल्या आजीबाई प्रसंगावधान दाखवून घराबाहेर आल्याने बचावल्या. दरम्यान घर कोसळल्यामुळे घरातील आठ सदस्यांनी एक झोपडीत आसरा घेतला आहे. दरम्यान कोसळलेल्या घराचा पंचनामा करण्याचे आदेश स्थानिक तलाठ्यांना दिले आहेत. अशी माहिती मनोरचे मंडळ अधीकारी वसंत बारवे यांनी दिली आहे. भर पावसाळ्यात घर कोसळल्याने बेघर झालेले हे आदिवासी कुटुंब आता सरकारची त्वरित मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top