दिनांक 23 February 2019 वेळ 8:59 PM
Breaking News
You are here: Home » नागरिक पत्रकार » वाहनांवर दगडफेक व गोळीबार

वाहनांवर दगडफेक व गोळीबार

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
           पालघर, दि. २२ : परिसरातील वाघोबा खिंड येथे गुरुवारी रात्री ७ ते ८ सशस्त्र दरोडेखोरांकडून दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. यावेळी दरोडेखोरांकडून वाहनांवर दगडफेक करण्यात आली. तसेच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत एक इसम गंभीर जखमी झाला असून एका दरोडेखोराला पोलिसांनी अटक केली.
काल गुरुवारी रात्री ९. ४५ च्या सुमारास पालघर मनोर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एम. एच. ४८/ए.एफ.या ३९९९ या क्रमांकाच्या क्रेटा कारवर व एम. एच. ४८/पी. ७८९६ या क्रमांकाच्या आय ट्वेन्टी कारवर वाघोबा खिंड परिसरातील गॅंगलात लपलेल्या दरोडेखोरांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. तसेच येथून जाणाऱ्या एका दुचाकीवर देखील गगडफ़ेक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात दुचाकीवर मागे बसलेला इसम गंभीर जखमी झाला. या घटनेची खबर मिळताच पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उप निरीक्षक सय्यद व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या या पथकाने दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारानंतर दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळ काढला. मात्र त्यातील एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. रात्री १०.३० वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता. या घटनेनंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून इतर दरोडेखोरांचा तपास सुरु केला आहे.
दरम्यान अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरासह इतर ७ ते ८ दरोडेखोरांविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top