खासदार राजेंद्र गावित यांची दांडी गावाला भेट पाणी समस्येवर केली चर्चा

0
20
Rajtantra_EPAPER_230618_1_010655वार्ताहर
             बोईसर, दि. २२ : मागील अनेक दिवसांपासून पाणी समस्येला तोंड देणाऱ्या पालघर तालुक्यातील दांडी गावाला आज, खासदार राजेंद्र गावित यांनी भेट देऊन येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याचे सुचवले.
साडे सहा हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या दांडी गावात मच्छीमार समाज मोठ्या प्रमाणात रहातो. मात्र गेले अनेक दिवस पिण्याचे पाणी मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या प्रश्नी ग्रामस्थांनी खासदार गावित यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे पाणी प्रश्न मांडला होता. त्यानुसार आज गावित यांनी दांडीला प्रत्यक्ष भेट देत येथील पाण्याची समस्या जाणून घेतली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याशी फोनद्वारे चर्चा करूनदांडीसह उच्छेळी व उनभाट गावाच्या पाणी प्रश्नावर कायम तोडगा काढण्याचे सुचवले. दरम्यान आज जिल्हा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, पालघर गटविकास अधिकारी घोरपडे आणि तालुका उप अभियंता लभाते यांनी इतर अधिकाऱ्यांसह दांडी गावास भेट देऊन या संदर्भात फणी केली.
               यावेळी कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले की, जीर्ण झालेल्या पाईप लाइनमुळे पाणी गळती मोठ्या प्रमाणात होर आहे. तसेच दांडी गावाचा परिसर दलदलीचा असल्याने आणि त्यामुळे तेथील लवकर सापडत नसल्याने थोडी अडचण होते. मात्र नवीन पाईप लाईन टाकल्यास हा प्रसन्न संपेल आणि पाणीपुरवठा सुरळीत होईल. म्हणून लवकरच नवीन पाईप लाईन टाकून तिन्ही गावात सुरळीत पाणी पुरवठा सुरु करू, असे आश्वसन त्यांनी दिले. तर २ जुलै रोजी नवीन पाईप लाईन टाकण्याची निविदा प्रक्रिया सुरु करून तातडीने काम सुरु करण्याच्या आदेश खासदार गावित यांनी अधिकार्याना दिले.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह भाजपा कार्यकर्ते विजय तामोरे, किरण तामोरे, हरकेश तामोरे, प्रज्ञेश शहा, संतोष राऊत, अजित म्हात्रे, शेखर तामोरे, तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Print Friendly, PDF & Email

comments