दिनांक 17 February 2020 वेळ 11:46 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » दहिसर चा शासकीय आयुर्वेदिक दवाखाना चार दिवसांपासून बंद

दहिसर चा शासकीय आयुर्वेदिक दवाखाना चार दिवसांपासून बंद

Rajtantra_EPAPER_230618_1_010632प्रतिनिधी
             मनोर, दि. २३ : वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाल्यामुळे दहिसरचा शासकीय आयुर्वेदिक दवाखाना चार दिवसांपासून बंद आहे.त्यामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे.
             दहिसर येथे आरोग्य विभागाचा आयुर्वेदिक दवाखाना आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र चहाडे या दवाखान्यापासून लांबच्या अंतरावर असून तिथपर्यंत येण्याजण्याच्या सुविधा मार्यदित आहेत. प्रत्येक दिवसाला 40 ते 50 बाह्यरुग्ण या दवाखान्यात येत असतात. दहिसर चे वैद्यकीय अधिकारी संजय मुनेश्वर यांची बोईसर नजीकच्या दाभोण येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. नवीन नेमणूक झालेले वैद्यकीय अधिकारी अनंत कडीखाये आतापर्यंत हजर झाले नाहीत. गेल्या चार दिवसांपासून दवाखाना बंद आहे. त्यामुळे रुग्णांना खाजगी वैद्यकीय उपचार घावे लागत आहेत.वैद्यकीय अधिकारी नसल्याचा फलक न लावल्याने रुग्णांना दवाखान्यात येऊन माघारी फिरावे लागते.ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांना खाजगी वैद्यकीय उपचार परवडत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड पडत आहे.
         पाऊस सुरू झाल्यावर या परिसरात साथीच्या आजार आणि सर्पदंशाच्या रुग्णांच्या संखेत वाढ होते. येथे नेमणूक झालेले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने हजर झाले पाहिजे आणि पावसाळ्यात मुख्यालयात राहून रुग्णाना वैद्यकीय सेवा दिली पाहिजे. अशी मागणी परिसरातून होत आहे.
दहिसर चा दवाखाना आयुर्वेदिक दवाखाना आहे .अत्यावश्यक
सेवेत तो येत नसल्याने पर्यायी वैद्यकीय अधिकारी देता येत नाही.
रुग्णांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे.
डॉ.अभिजित खंदारे
तालुका वैद्यकीय अधिकारी, पालघर.
प्राथमिक आरोग्य केंद्र लांबच्या अंतरावर असल्याने स्थानिक रुग्णांची
भिस्त या दवाखान्यावर आहे.तातडीने दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी
देण्यात यावा. अन्यथा दवाखान्याला टाळे ठोकण्यात येईल.
दशरथ जाधव,
ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच,दहिसर.

comments

About Rajtantra

Scroll To Top