दिनांक 03 July 2020 वेळ 3:41 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » इंधन दरवाढ त्वरित रद्द करा किसान सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

इंधन दरवाढ त्वरित रद्द करा किसान सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Rajtantra_EPAPER_230618_4_010633प्रतिनिधी
            कुडूस, दि. २२ : पेट्रोल, डिझेल व गॅससिलेंडर दरवाढ त्वरीत रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभा या संघटनेने केली  आहे.
            किसान सभेच्या कार्यकारिणीने जिल्हा परिषद पालघरचे जिल्हा अधिकारी यांना भेटून निवेदन दिले. या वेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष माधव चौधरी, सचिव शिवराम पाटील, जिल्हा सचिव कल्पेश पाटील,सहसचिव सुनिल पाटील यांच्या सह किसान सभेचे अन्य सदस्य उपस्थित होते.निवेदनातून पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
            इंधन दरवाढीमुळे प्रवास व वाहतूकीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्या मुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आवाक्याच्या बाहेर वाढल्या आहेत. सर्व सामान्य माणसाला जगणे कठिण झाले आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार १ फेब्रुवारी २०१३ पासून कायद्यामध्ये बसत असलेल्या नवीन शिधापत्रिका धारकांना प्राधान्याने कुटूंब लाभार्थी योजनेचे लाभ दिला जातो. मात्र अनेक लाभार्थी यापासून वंचित असून अश्या सर्व शिधापत्रिका धारकांना नियमितपणे धान्य व रॉकेल देणे सुरु करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top