दिनांक 19 February 2019 वेळ 4:08 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डहाणूत दिव्यांग विद्यार्थ्यांची योग साधना

डहाणू : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डहाणूत दिव्यांग विद्यार्थ्यांची योग साधना

IMG-20180621-WA0224प्रतिनिधी 
            डहाणू, दि. २१ : चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योग समिती डहाणू आणि लायन्स क्लब ऑफ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणूतील इराणी रोड येथील मुक बधीर शाळेत योग साधना शिबिराचे सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत आयोजन करण्यात आले होते. शिबिरा मध्ये ७७ विद्यार्थी, पालक व शाळेतील ८ शिक्षकांनी सहभाग घेतला.  योग शिक्षक उत्तम सहाणे, विनायक बारी, सौ. इंदिरा कुंतावाला, मंगला गावडे, सोनल मणियार यांचे योग साधकांना मार्गदर्शन लाभले.
            योग दिनानिमित्त डहाणूत सिरीन दिनीयार हायस्कूल, रुस्तमजी महाविद्यालय, के. के. मिस्त्री हायस्कूल, कस्तूरबा कन्या विद्यालय, केंद्र शाळा सावटा,  मल्याण जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा, मॉडेल हायस्कूल, नगरपरिषद कम्यूनिटी हॉल, पटेल पाडा या व अशा इतर अनेक ठिकाणी योग साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  शिबिरा मध्ये विद्यार्थी, पालक शिक्षक व नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. सध्या उद्भवणारे विविध आजार, त्याची कारणे, त्यावर उपाय म्हणून उपयुक्त आसने व प्राणायामाचे प्रकार याचीही उपस्थितांना माहिती करुन देण्यात आली.  शिबिरातील नागरिकांची उपस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top