दिनांक 20 September 2018 वेळ 2:35 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » बोईसर : विदर्भ मित्र मंडळाच्यातर्फ विदयार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्याचे वाटप

बोईसर : विदर्भ मित्र मंडळाच्यातर्फ विदयार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्याचे वाटप

IMG-20180621-WA0020वार्ताहर 
         बोईसर, दि. २१ : येथील विदर्भ मित्र मंडळाच्या तर्फे सालवड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विदर्भ मित्रमंडळातर्फे बोईसर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून विदर्भ मित्रमंडळाचे सदस्य तथा सालवड ग्रामपंचायतीचे सदस्य कृष्ण देखमुख यांनी सालवड जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. मुलांना खरी गरज ओळखून त्यांनी सुरवातीलाच एक मदत म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप केले. वह्या, दप्तर, पाण्याची बॉटल, टिफिन, पेन-पेन्सील आदी साहित्याचा यात समावेश होता. यावेळी पंचायत समिती सदस्य वीणा देशमुख, कोकियी कॅम्लिन कंपनीचे व्यवस्थापक अजित राणे व विदर्भ मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

comments

About Rajtantra

Scroll To Top