दिनांक 22 August 2019 वेळ 2:49 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या डहाणू केंद्रातर्फे योग कार्य शाळेचे आयोजन

प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या डहाणू केंद्रातर्फे योग कार्य शाळेचे आयोजन

IMG_20180619_174920255गिरीश कोकीळ
          डहाणू, दि. २० : प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या डहाणू केंद्रातर्फे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेंट मेरी हायस्कूलच्या सभागृहात मसोली येथे मंगळवार १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रजापिता ब्रम्हाकुमारी संस्थेचे आंतरराष्ट्रीय व्याख्याते डॉ प्रेम मसंद हे प्रमुख व्याख्याते म्हणून तर संस्थेच्या आध्यात्मिक वक्त्या व फिजीयो डॉ दामिनी  विशेष यांचे मार्गदर्शन लाभले.
             जिवन एक समारंभ असून आजचा दिवस हा उत्सव आहे असे समजून आयुष्य आनंदाने जगले पाहिजे. प्रत्येकाला आनंद मिळण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात परंतु सध्याच्या काळात निरोगी शरीर लाभणे हा सगळ्यात मोठा आनंद आहे. प्रत्येकाला जिवनात अडचणी येत असतात परंतु त्याचा मनावर ताण घेण्यापेक्षा आनंदाने त्या अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शरीर व मन निरोगी राहण्यासाठी शांत झोप, सकस आहार, सकारात्मक चांगले विचार व लोकांमध्ये मिसळून विचारांचे आदान प्रदान करणे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यांनी पुढे असेही सांगितले की आपले पाय हे दुसरे हृदय असून आपण जेवढा चालण्याचा व्यायाम करू तेवढे आपले हृदय स्वस्थ राहील. आनंदी वृत्ती ठेवली तर कोणताही आजार जवळपास येणार नाही. आपल्याला सगळ्यांना नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी सर्व गोष्टी मिळाव्यात अशी अपेक्षा असते आणि तसे घडले नाही तर नैराश्य येते. त्यामुळे नजीकच्या काळात नैराश्य हा एक मोठा आजार बनू शकतो.
               डॉ दामिनी यांनी वेगवेगळ्या आजारांवर योगातील उपयुक्त आसने व प्राणायाम प्रकारांची माहिती दिली. शरीर व मन निरोगी राहण्यासाठी सकस आहाराचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. प्रेम व तिरस्कार यांचे जिवनातील फायदे व तोटे समजावून सांगितले. तसेच संगीताच्या तालावर उपस्थितांकडून योगातील विविध आसने व प्राणायाम करुन घेतले.
             प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या डहाणू केंद्रातील नम्रता बहेन यांनी ध्यान धारणेचे महत्व सांगितले व उपस्थितांना प्रत्यक्ष ध्यान धारणा करायला शिकवले.
              कार्यक्रमाला डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, नगरसेवक जगदीश राजपूत, सेंट मेरी शाळेचे ट्रस्टी सी. एम. बोथरा, हेमंत पांचाल, डॉ. भट, भरत शहा आणि विनायक बारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच डहाणू व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जेष्ठ नागरिकांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. जगदीश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

comments

About Rajtantra

Scroll To Top