दिनांक 23 February 2018 वेळ 12:27 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » नूतन बाल शिक्षण संघातर्फे इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय

नूतन बाल शिक्षण संघातर्फे इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय

राजतंत्र न्यूज नेटवर्क
डहाणू दि. १३: अलिकडच्या काळात पालकांचा बदलेला विचार व इंग्रजी शिक्षणाकरीता वाढती पसंती ह्याचा विचार करून नूतन बाल शिक्षण संघातर्फे डहाणूत इंग्रजी माध्यमाच्या शालेय शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. १९१६-१७ या शैक्षणिक वर्षात डहाणू शहराच्या पूर्वेकडील पटेल पाडा येथे सर्वप्रथम प्ले ग्रुप ची सुरुवात करण्यात आली. आता जून २०१७ पासून नर्सरी वर्गाची सुरुवात होत असून ह्या वर्गासाठी प्रवेश सुरू झाले आहेत.
शिक्षण हे समाजातील सर्व स्तरातील मुलांना मिळायला पाहिजे या विचारानी प्ले ग्रुप व नर्सरी वर्गाची फी अवघी 300 रुपये आकारण्यात येत आहे. प्रवेशा साठी फी खेरीज  कुठल्याही प्रकारची अनामत अथवा देणगी घेतली जात नाही हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. आनंददायी शिक्षण पद्धतीचा उपयोग करून, दरवर्षी एक पुढची इयत्ता सुरू करण्याचा मानस संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
बालशिक्षणाचे महत्व जाणून 1945 साली पद्मभूषण कै. ताराबाई मोडक यांनी डहाणू तालुक्यातील कोसबाड सारख्या आदिवासी दुर्गम भागात नूतन बाल शिक्षण संघ ही संस्था सुरू केली. त्या काळात या भागात दळणवळणाची सुविधा व एकंदरीतच सोई सुविधांचा अभाव होता. मात्र युरोपियन संकल्पनेतील खर्चिक असे मॉन्टेसरी पद्धतीचे शिक्षण स्थानिक पातळीवर कमीतकमी पैसे खर्च करून कसे देता येईल याचा विचार करुन ताराबाईंनी या आदिवासी मागासलेल्या दुर्गम भागामध्ये शिक्षणाचे प्रयोग सुरू केले.  मॉन्टेसरी पद्धतीचे पूर्णपणे भारतीयकरण करुन वर्षे 3 ते 6 वर्षे  वयोगटातील बालकांना शिक्षणाचे पहिले धडे द्यायला सुरुवात केली. कै. अनुताई वाघ यांनी ताराबाईंच्या या कार्यात त्यांना साथ दिली. दोघींनी मिळून अथक परिश्रम करून कोसबाड येथे बालशिक्षणाची विकासवाडी फुलवली.
या दरम्यान या कार्याने प्रभावित होऊन 1982 साली श्री रामकृष्ण उर्फ तात्यासाहेब करंदीकर यांनी डहाणू शहरातील पटेल पाडा येथे अनुताईंना 20 गुंठे जमीन दान दिली. त्या जागेवर 1985 पासून बालवाडी चालवली जाते. आता शैक्षणिक क्षेत्रातील बदलती गरज लक्षात घेऊन याच ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यासाठी प्रथम प्ले ग्रूप व आता नर्सरी सुरु करुन श्री गणेशा करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top