दिनांक 14 November 2018 वेळ 11:38 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » ज्ञानमाता आदिवासी आश्रम विद्यालयाचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

ज्ञानमाता आदिवासी आश्रम विद्यालयाचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

IMG-20180615-WA0053प्रतिनिधी
मनोर, दि, १९ : तलासरी तालुक्याच्या झरी येथील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालयाचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. 
           यावेळी शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी विशेष तारपा नृत्य करत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शिक्षकांनी आदर्श परिपाठ दाखवत विद्यार्थ्यांना शाळा स्थापनेपासून ते आतापर्यंतचा प्रवास आणि शाळा राबवत असलेले उपक्रम सांगितले. तसेच नवीन विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाबत माहिती दिली. शाळेचे माजी विद्यार्थी आणि वेढी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक सुधीर डावरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तके आणि बिस्किटे वाटप करण्यात आली.
         २०१६ ला स्थापन झालेले ज्ञानमता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल गेली तीन वर्षे १०० % लागला तसेच यंदाचा दहावीचा निकाल ९५ % लागला असल्याने प्राचार्य सिस्टर बस्तीयाना फर्नांडिस आणि संस्था संचालक फादर वेंडल डीक्रूझ यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top