दिनांक 19 February 2019 वेळ 4:13 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » केळवे समुद्र किनाऱ्यावर ४ मुले बुडाली

केळवे समुद्र किनाऱ्यावर ४ मुले बुडाली

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
              पालघर, दि. १७ : पालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द अश्या केळवे पर्यटनक्षेत्रात फिरण्यासाठी आलेल्या ४ पर्यटक युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या ७ युवकांपैकी ४ जण बुडून मृत्युमुखी पडले असून उर्वरित ३ जण बचावली आहेत.
हे सर्व जण नालासोपारा येथील रहिवासी असून २० वर्षाखालील आहेत. आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास हे युवक केळवे येथील समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र समुद्रात पोहण्याचा सराव नसलेले हे युवक गटांगळ्या खाऊ लागले. काही स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी समुद्रात धाव घेतली. मात्र यातील ४ जण दुर्दैवी निघाले. ३ जण मात्र सुखरूपपणे समुद्राबाहेर येऊ शकल्याने बचावले आहेत.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे : १) दीपक परशुराम छळवादी (२०), २) दीपेश दिलीप पेडणेकर (१७), ३) क्षीतेज नाईक (१५), ४) तुषार चिपटे (१५) यातील दीपक परशुराम छळवादी याचा मृतदेह हाती लागला असून अन्य तिघांचे शोधकार्य चालू आहे.
या दुर्घटनेत बचावलेल्या युवकांची नावे पुढीलप्रमाणे : १) गौरव भिकाजी सावंत (१७), २) संकेत सचिन जोगले (१७), ३) देविदास रमेश जाधव (१६) या सर्वांवर प्रथमोपचार करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top