दिनांक 19 February 2019 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनोर परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी.

मनोर परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी.

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
            मनोर, दि. १६ : मनोर परिसरात मुस्लिम लोकवस्ती असलेल्या टेन, दहिसर, सोनावे आणि काटाले येथे काल चंद्र दर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली. यावेळी लहान मुलांनी रोझे पूर्ण केल्याने त्यांचे इदी देऊन कौतुक करण्यात आले.

           मनोर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक मशिदी मध्ये सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास नमाज इदु उल फित्र ची विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.आणि शिरखुरम्याचा आस्वाद घेतला.

          मुस्लिम धर्मामध्ये रमजान महिना पवित्र मानला जातो आणि या महिन्याला विशेष महत्व आहे.या महिन्यात निर्जला उपवास(रोजे) ठेवण्यात येतात. गोरगरिबांना ईद साजरी करता यावी याकरिता जकात आणि फित्रा दिला जातो. महिनाभर पाच वेळच्या नमाज सोबत रात्रीच्या वेळीच तराविह ची विशेष नमाज अदा केली जाते.
          या महिन्याचे शेवटच्या १० दिवसामध्ये काही लोक एत्तेकाफ मध्ये बसतात. चंद्र दर्शनानंतर शवाल महिन्याच्या पहिल्या दिवशी ईद साजरी केली जाते. आज मनोर  परिसरातील सर्वच मशीदीत उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांना विविध पक्षाचे पदाधिकारी, संस्था व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
           पहाटे साडे पाच च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे महावितरणचा विजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या आनंदावर विरजण पडले.

comments

About Rajtantra

Scroll To Top