दिनांक 15 November 2018 वेळ 3:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » महावितरणच्या मुख्य वाहिनीमध्ये बिघाड, जिल्ह्याचा रविवार अंधारात

महावितरणच्या मुख्य वाहिनीमध्ये बिघाड, जिल्ह्याचा रविवार अंधारात

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
बोईसर, दि. १७ : शनिवारी पावसाच्या हलक्या सरींना झालेली सुरुवात महावितरणला झेपलेली नसून अर्धा पालघर जिल्हा शनिवारी रात्री अंधारात राहिला. रविवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे लोकांचा हिरमोड झाला.
             शनिवारी पावसाच्या हलक्या सरी ने सुरवात झालेल्या  पहिल्या पावसातच  रात्री वीज पुरवठा खंडित  झाला. शनिवारी बोईसर शहरात संपूर्ण रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
             बोईसरला खैरापाडा येथील 132 के.व्ही. क्षमतेच्या वितरण केंद्राला मुंबईहून मुख्य वाहिनीद्वारे वीज पुरवठा होतो व तिथून संपूर्ण बोईसर परिसराला वीज वितरित केली जाते. ह्या मुख्य वाहिनीतील बिघाडामूळे सर्व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. तसेच तारापूर एमआयडीसी मध्ये देखील वीज खंडित  झाल्याने पाणी पुरवठा देखील खंडित झाला. संपूर्ण उद्द्योगनगरी ठप्प झालेली होती.

comments

About Rajtantra

Scroll To Top