दिनांक 22 August 2019 वेळ 2:18 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » चिल्हार फाट्यावरील पागी पाडयाचा वीजपुरवठा सुरळीत सुरु

चिल्हार फाट्यावरील पागी पाडयाचा वीजपुरवठा सुरळीत सुरु

IMG-20180615-WA0050राजतंत्र न्युज नेटवर्क
             मनोर, ता.१७ : चिल्हार फाटा येथील पागी पाडयाचा वीजपुरवठा शुक्रवार (ता.१५)सायंकाळी पूर्ववत करण्यात आला. दैनिक राजतंत्र मध्ये विजेविना चिल्हार पागी पाडा तीन दिवसांपासून अंधारात” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच महावितरण च्या अभियंत्यांनी हालचाल करून ताबडतोब वसई च्या कंत्राटदारामार्फत शुक्रवारी सकाळी काम सुरू केले. सायंकाळपर्यंत नवीन खांब उभे करून त्यावर जुनेच रोहित्र बसविण्यात आले. काही विद्युत रोधक उपकरणांची डागडुजी करून उच्च विद्युत दाबाच्या तुटलेल्या तारा पुन्हा जोडून सायंकाळी सात वाजता वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. गेले चार दिवसांपासून असह्य उकाडा आणि मच्छरांमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.
राजतंत्र मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्याने गेले वर्षभरापासूनची आमची समस्या सुटली. पागी पाडा ग्रामस्थांनी याकरिता राजतंत्र चे आभार मानले.
महावितरण कडे गेले वर्षभर तक्रारी आणि अर्ज करूनही समस्या
सुटली नव्हती. राजतंत्र मध्ये बातमी प्रसिद्ध होताच आमची समस्या
एक दिवसात सुटली. राजतंत्र चे मनापासून आभार.
                                                               – वसंत रावते, ग्रामस्थ, 
राजतंत्र च्या बातमी मुळे आमची समस्या एका दिवसात सुटली. 
राजतंत्र चे मनापासून आभार.
                                                                      – नरेश वरठा,
                                              जिल्हा उपाध्यक्ष श्रमजीवी संघटना,पालघर.

comments

About Rajtantra

Scroll To Top