दिनांक 19 February 2019 वेळ 4:00 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा : नव्या मुख्याधिकाऱ्यांच्या स्वागताला धावले सारे नगरसेवक 

वाडा : नव्या मुख्याधिकाऱ्यांच्या स्वागताला धावले सारे नगरसेवक 

IMG_20180617_124248प्रतिनिधी
वाडा, दि. १७ : वाडा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी पदावर नव्यानेच हजर झालेल्या  प्रबोधन मवादे यांच्या स्वागताला नगर पंचायतीचे बहुतांश नगरसेवक धावल्याने ह्यात  नगरसेवकांची हतबलताच दिसून आली. 
            वाडा नगरपंचायतीची एप्रिल २०१७ मध्ये स्थापना झाल्यापासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने वाडा शहर समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. सुरवातीला प्रशासक म्हणून तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी कार्यभार पाहिला. तर डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता आली. तर प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र  नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना पदभार स्वीकारून सहा महिन्यांचा  कालावधी लोटला तरी वाडा शहराच्या समस्या सोडविण्यात अपयश आले. प्रभारी मुख्याधिकारी असल्याने ठोस निर्णय घेण्यात मुख्याधिकाऱ्यानी भूमिका घेतली नाही. त्यातच नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसल्याने नगरपंचायतीचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. नवनिर्वाचित सदस्यांना नगरपंचायत नियम व कायद्यांची पुरेशी माहिती नसल्याने मुख्याधिकाऱ्यांवर अवलंबून रहावे लागत असल्याने नगरपंचायत कारभारात मुख्याधिकारी पदाचे महत्व आपसूकच वाढल्याचे चित्र नगरसेवकांनी केलेल्या स्वागताने अधोरेखित झाले आहे.
          उल्हासनगर महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या प्रबोधन मवादे यांची वाडा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर शुक्रवारी ( दि. १५ ) त्यांनी पदभार स्वीकारला. मवादे नगरपंचायतीत हजर होताच बहुतांश नगरसेवक गुच्छ घेवून त्यांच्या स्वागताला धावले. नगरपंचायत प्रशासकीय कामात लोकप्रतिनिधीसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असली तरी मवादे हे मुख्याधिकारी म्हणून हजर होताच त्यांच्या स्वागताला नगरसेवक लगोलग गेल्याने प्रशासनापुढे नगरसेवकांनी नांगी टाकल्याचीच चर्चा संपूर्ण शहरात पहावयास मिळत आहे

comments

About Rajtantra

Scroll To Top