दिनांक 04 July 2020 वेळ 1:58 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वाडा : शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी भरवली शाळा 

वाडा : शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी भरवली शाळा 

IMG-20180615-WA0061प्रतिनिधी
            वाडा, दि. १५: शाळा सुरू होण्याचा पहिलाच दिवस, छोटे शाळकरी विद्यार्थी उत्साहात शाळेच्या प्रांगणात हजर, मात्र शाळेतील शिक्षकच गैरहजर. अशा परिस्थितीत पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती निलेश गंधे हे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले, शिक्षक हजर नसल्याने गंधे यांनीच विद्यार्थ्यांची शाळा भरवून विद्यार्थ्यांना धडे दिले. एवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांना जेवणही वाढले.
              गुरुवारी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने वाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने काही ठराविक शाळेच्या शिक्षकांना सकाळी साडेसात वाजता शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यातीलच तालुक्यातील देसई ही शाळा. शाळेचा पहिलाच दिवस असल्या कारणाने विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी निलेश गंधे हे ग्रामीण भागातील शाळांना भेटी देण्यासाठी गेले मात्र सकाळी नऊ – साडेनऊ वाजता देखील देसई शाळेला कुलूप असल्याचे व विद्यार्थी ताटकळत उभे असल्याचे पाहिले. नंतर शाळेच्या व्हरांड्यातच शाळा भरवली व विद्यार्थ्यांना जेवणही वाढले.
             दरम्यान उपाध्यक्ष शाळेवर पोहोचल्याचा संदेश मिळाल्यावर शिक्षक घाईघाईने शाळेवर पोहोचले. परंतु यावेळी उपाध्यक्षांनी शिक्षकांची चांगलीच झाडाझडती घेतली व देसई शाळेतील जबाबदार शिक्षकांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेशही गटशिक्षणाधिकारी यांना दिले.
Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top