दिनांक 04 July 2020 वेळ 2:19 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » शिस्त आणि मेहनतीमुळेच यश प्राप्त होते! – मुस्तफा मेमन

शिस्त आणि मेहनतीमुळेच यश प्राप्त होते! – मुस्तफा मेमन

20180613_124001प्रतिनिधी
             कुडूस दि. १३ : शाळेतील शिक्षकांची मेहनत व शिस्त याचे फलीत विद्यार्थ्यांच्या यशातून मिळते. विद्यार्थी तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते शिक्षकांचे मार्गदर्शन मनापासून घेतात. असे प्रतिपादन नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभातुन केले. 
             कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूल मधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील कनिष्ठ विद्यालयीन विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ओम प्रकाश शर्मा होते. शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी गुरू, आई आणि वडील यांना कधीही न विसरता त्यांच्या रूणात रहावे. जो या पैकी कुणाला विसरला तर तो जीवनात कधीही सुखी होऊ शकणार नाही. असा मौलिक सल्ला दिला. या वेळी शर्मा यांनी नॅशनल स्कूलच्या निकालाबाबत समाधान व्यक्त करून संस्थेचे अध्यक्ष मुस्तफा मेमन व शिक्षक यांना धन्यवाद दिले. या शाळेत  व्यावसायिक शिक्षण आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
           प्रारंभी शिष्यवृत्ती धारक व तीन्ही शाखेत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र व स्मृतीचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तीन विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती मिळाली असून १४ विद्यार्थी ३०% शिष्यवृत्तीचे मानकरी आहेत तर१८  विद्यार्थ्यांना २५% शिष्यवृत्ती मिळेल असे प्रिंसिपल फॅबिना मॅडम यांनी सांगितले.
           प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना श्रीकांत भोईर यांनी या शाळेच्या परंपरागत यशा बद्दल मुस्तफा मेमन व प्रिन्सिपल फॅबिना मॅडम यांना धन्यवाद दिले व त्यांच्या अथक परिश्रमामुळेच शाळेचा शंभर टक्के निकाल लागतो. असे प्रशंसोद्गार काढले.कार्यक्रमातुन शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी आपले विचार मांडले.
           कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ओमप्रकाश शर्मा, श्रीकांत भोईर, अशोक पाटील, चिंचघर सरपंच संकेत नांगरे, उपसरपंच नामदेव भोईर, शिवसेना नेते गोविंद पाटील, कुडूस ग्रामपंचायतचे सदस्य सचिन भोईर, सामाजिक कार्यकर्ते रामदास जाधव, नितिन जाधव, रफीक मेमन आदी मान्यवर उपस्थित होते.
Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top