दिनांक 12 December 2019 वेळ 9:36 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » विजेविना चिल्हार पागी पाडा तीन दिवसांपासून अंधारात.

विजेविना चिल्हार पागी पाडा तीन दिवसांपासून अंधारात.

20180611_182511राजतंत्र न्युज नेटवर्क
            मनोर, ता.१२ : चिल्हार फाटा येथील पागी पाड्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राचे (ट्रान्सफॉर्मर) खांब गंज लागून वाकल्याने उच्च विद्युत दाबाची तार तुटली आहे. त्यामुळे पागी पाडा तीन दिवसापासून अंधारात आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालागतच्या चिल्हार पागी पाड्याला महावितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहीत्राचे खांब गंजले आहेत.आणि त्यांमुळे रोहित्र कलंडण्याच्या स्थितीत आले आहे. दोन दिवसाआधी आलेल्या वारा आणि पावसाने उच्च दाबाची तार तुटून पडली,त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.आणि त्याच तुटलेल्या उच्च दाबाच्या तारेने ज्या खांबांवर रोहीत्र आहे ते खांब पडू नये म्हणून बांधून ठेवण्यात आले आहेत.रोहित्राच्या शेजारी लोकवस्ती असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे चिल्हार पागी पाडयाचे ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.
चिल्हार पागी ग्रामस्थांनी वारंवार विजेच्या समस्येबाबत महावितरण कडे तक्रारी केल्या होत्या.परंतु वेळीच तक्रारींची दखल न घेतल्याने आज ही परिस्थिती ओढवली आहे.
चिल्हार पागी पाडा येथे नवीन रोहित्र बसविण्यासाठी
प्रशासकीय मंजुरी मिळाली असून कंत्राटदारास काम
सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर
काम सुरू करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.
रमेश कदम
अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण.
दोन दिवसात वीज पुरवठा पूर्ववत झाला नाही तर श्रमजीवी
संघटनेमार्फत महावितरणच्या सावरखंड सबस्टेशन ला
घेराव घालण्यात येईल.
नरेश वरठा
-जिल्हा उपाध्यक्ष श्रमजीवी संघटना.
गेल्या वर्षभरामध्ये वारंवार महावितरण कळवूनही चिल्हारसारख्या
आदीवासीबहुल ग्रामीण भागातील विजेच्या समस्या सुटत नाही.
महावितरण च्या ढिसाळ कारभाराचा हा उत्तम नमुना आहे.
वसंत रावते-
ग्रामस्थ चिल्हार पागी पाडा.मनोर,

comments

About Rajtantra

Scroll To Top