दिनांक 22 February 2019 वेळ 3:59 AM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » भाजपच्या साम- दाम- दंड- भेदासमोर  शिवसेना वाघासारखी लढली  – ना. एकनाथ शिंदे

भाजपच्या साम- दाम- दंड- भेदासमोर  शिवसेना वाघासारखी लढली  – ना. एकनाथ शिंदे

IMG-20180612-WA0011राजतंत्र न्युज नेटवर्क
             डहाणू दि. १२ : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या साम- दाम- दंड- भेदासमोर शिवसेना वाघासारखी लढली. त्यामुळे ह्या निवडणूकीत पराभव झाला असला तरी तो विजयासमानच असल्याचे प्रतिपादन बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी डहाणू येथे बोलताना केले.
              ते विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवीत असलेले संजय मोरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. शिवसेना डहाणूत मतदारसंघात 32 हजार मतांपर्यंत पोहोचली असल्याने यातून शिवसेनेची वाढती लोकप्रियता लक्षात येत आहे. त्याचा भाजपने धसका घेतला आहे असेही शिंदे म्हणाले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख व आमदार रविंद्र फाटक, पालघरचे आमदार अमित घोडा, श्रीनिवास वणगा, केतन पाटील, उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी, उमेदवार संजय मोरे, तालुकाप्रमुख संतोष वझे, शहर अध्यक्ष संजय कांबळे, माजी नगरसेवक संजय पाटील, तुषार पाटील उपस्थित होते.
सुशिक्षित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करा
प्रतिनिधी
          बोईसर दि. १२ : कोकण पदवीधर मतदान संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसैनिकांना सुशिक्षित मतदार पर्यंत जाण्याची संधी मिळेल व ही संधी न गमावता या संधीचे सोने करून संजय मोरे याना विधान परिषदमध्ये पाठवा असे आवाहन बांधकाम मंत्री तथा ठाणे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोईसर व पालघर मधील कार्यकर्ते ना आवाहन केले .
यावेळी पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख  रवींद्र फाटक,  सहसम्पर्क प्रमुख केतन पाटील , पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण , पालघर  जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, माजी जिल्हा प्रमुख प्रभाकर राऊळ,  पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे , पालघर उपनगराध्यक्ष रईस खान , पालघर विधानसभा वैभव संखे,  तालुका प्रमुख सुधीर तमोरे, व नीलम संखे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .
यावेळी पुढे पालघर जिल्ह्यामधील  आताच झालेली  लोकसभेचा निकाल पाहता अनेक ठिकाणी मशीन बंद करून मतदान केले आहे . व काही बूथ मध्ये महिलांची च मतदान केल्याचे उघड आलेत्यावेळी पुरुष मतदारझोपले होते असा टोला शिंदे नि विरोधकांवर लगावला . त्यावेल्स हे बोगस मतदान करून विजय मिळवला  त्याचे समाधान त्यांना झाले नाही .
प्रत्येक शिवसैनिक कानी अगदी ताकदीनिशी उतरून काम केले व जरी आपण विजय नाही झाला तरी आपण खऱ्या अर्थाने विजय असल्याचा आनंद प्रत्येक शिवसैनिका मध्ये दिसून आला असे उदगार शिंदे यांनी बोईसर आणि पालघर येथील शिवसैनिकांना केले. संजय मोरे  हे शाखा प्रमुख पासून ते  महापौर असा प्रवास केला प्रत्येक वेळी जबाबदारीने काम करणारा   संघर्ष करून मोठा झालेला कार्यकर्ते उमेदवारी मिळाली आहे . त्यामुळे शिक्षणाचे प्रश्न, विद्यार्थी, शिक्षक,  रोजगार, मतदारांचे असे अनेक प्रश्न सोडविण्यात पुढे राहतील, असे शिंदे म्हणाले 
        मागील  कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदाराने सहा वर्षे पालघर जिल्ह्यामध्ये कधी वळून पाहिले नाही फक्त दर सहा वर्षानी पदवीधारक ची निवडणूक लागल्यावर कोणीतरी येऊन भेटणार व फोन व मॅसेज च्या माध्यमाने शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडणुक लढवत होते.  मात्र आता ही निवडणूक शिवसेनेचा उमेदवार निवडून यावा याकरिता पक्ष प्रमुख उद्धव साहेब, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी स्वतः अग्रेसर आहेत त्यामुळे कोकण विभाग हा शिवसेनेचे बालेकिल्ला आहे हा मतदार संघ।शिवसेने कडेच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेशिवाय पर्याय नाही, आपण आपली जबाबदारी सांभाळून काम करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

comments

About Rajtantra

Scroll To Top