दिनांक 24 February 2020 वेळ 8:27 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » महावितरणवर श्रमजीवीचा हल्लाबोल मोर्चा काढून विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले

महावितरणवर श्रमजीवीचा हल्लाबोल मोर्चा काढून विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले

IMG_20180611_122630राजतंत्र न्युज नेटवर्क
             वाडा, दि. ११: आपल्या विविध विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या वाडा कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून निषेध नोंदवला. सर्वप्रथम खंडेश्वरी नाका येथुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. विद्युत वितरण कार्यालयासमोर मोर्चा विसर्जित होऊन त्याचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले. 
या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवीचे जिल्हा संघटन प्रमुख किशोर मढवी, संघटक सरिता जाधव, तालुका अध्यक्ष जानु मोहनकर यांनी केले. वाडा तालुक्यात अनेक गाव पाड्यात विजेची कामे गेली तीन चार वर्षापासून प्रलंबित आहेत. श्रमजीवी संघटनेने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही महावितरण प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संतापलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यानी आज कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून अधिका-यांना जाब विचारला. विशेष म्हणजे आज दुपारचे जेवणही मोचेॅकरांनी महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात शिजवून खाल्ले. यावेळी आदिवासी कष्टकरी ढोर नाय माणूस हाय माणूस हाय….., माणुसकीची भिक नको, हक्क हवा हक्क हवा……, कोण म्हणतो देणार  नाय घेतल्याशिवाय राहणार नाय……. अशा असंख्य  घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे माजी  तालुका अध्यक्ष मिलिंद थुले, जिल्हा उपाध्यक्ष  सुरेश पराड,सहसचिव मनोज काशिद,संघटक  बाळाराम पाडोसा ,कैलास तुंबडा आदी नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
विजेची कामे तत्काळ सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांनी मोचेॅकरांना दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.
पोलिसांशी बाचाबाची 
आंदोलनकतेॅ मोर्चा घेऊन येत असताना महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चा नेण्यास मज्जाव केला. मोर्चा प्रवेशद्वाराच्या बाहेरच मोचेॅकरांना थांबण्यास सांगितले. मात्र आंदोलनकतेॅ थेट प्रांगणात आले. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली.

comments

About Rajtantra

Scroll To Top