दिनांक 27 May 2020 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » डहाणूच्या रुस्तमजी अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय महाकौशल्य स्पर्धेत दैदीप्यमान यश 

डहाणूच्या रुस्तमजी अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय महाकौशल्य स्पर्धेत दैदीप्यमान यश 

IMG-20180609-WA0209राजतंत्र न्यु नेटवर्क
            डहाणू, दि. ११ : भारत सरकारच्या कौशल्य विभागाकडुन १३ व १४ मे रोजी कुर्ल्यातील डॉन बॉस्को महाविद्यालयात राज्यस्तरीय महाकौशल्य “महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते.  राज्यातील साधारण १०० महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. डहाणूतील रुस्तमजी अकादमी फॉर ग्लोबल करिअरच्या कौशल्य शिक्षणाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. 
             अकादमीच्या  स्थापत्य विभागाच्या कु. असमा अन्सारी हिने सुवर्ण पदक तसेच अभिषेक पाटील व प्रसाद महंदारे यांनी रौप्य पदक, हाॅटेल मॅनेजमेंट विभागाच्या तेजांगण दाणु, साहील सावंत व निशा माप्रलकर यांनी सुवर्ण पदक आणि राहुल चौधरी याने रौप्य पदक,  तर इलेक्ट्रीकल विभागाच्या वैभव राऊत व पुजा कोलपुसे यांनी विविध स्पर्धामधुन रौप्य पदक पटकावले.
महाकौशल्य ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जात असुन विजेत्या स्पर्धकांना जयपुर येथे होणार्‍या विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.
            गेल्या वर्षी यांच स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर नगमा शेख व निशाद जोशी यांनी रौप्य पदकाची कमाई केली होती.  विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी संस्थेचे प्राचार्य संजय साथु, प्रा. भारत वासवानी तसेच सर्व विभागाचे प्रमुख व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थ्यांना लाभते. महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे तसेच कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, अशी माहिती महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक श्री.विनोद शिंदे यांनी दिली
           सर्व विजेत्या स्पर्धकांचे विविध स्तरांतील मान्यवरांकडुन अभिनंदन होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top