दिनांक 24 February 2020 वेळ 7:58 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
                पालघर, दि. १० : पिकांवर ओढवणारी नैसर्गिक आपत्ती तसेच कीड व रोगांपासून पिकाचे होणारे नुकसान यातून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्य शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी केले आहे. ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार असुन पुनर्र्चीत हवामानावर आधारित चिकू या पिकासाठी देखील विमा संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती देखील तरकसे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, कृषी क्ष्रेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, हि योजना उद्दिष्ट्य आहेत, तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्ष्रेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक आहे. तसेच खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाचे आगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी भाताकरिता ७२८ रुपये ३३ पैसे प्रति हेक्टरी, नाचणीसाठी २ टक्के मी हणजे ४०० रुपये प्रति हेक्टरी व उडिदाकरिता ३७८ रुपये प्रति हेक्टरी असून कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत हा हप्ता जमा करावयाचा आहे. चिकूची ३० जून २०१८ पर्यंत विमा हप्ता भरावयाचा असून तो २ हजार ७५० रुपये प्रति हेक्टरी इतका आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. भातासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ४२ हजार १०० रुपये, नाचणीसाठी हेक्टरी २० हजार रुपये आणि उडीदासाठी १८ हजार ९०० इतकी आहे

comments

About Rajtantra

Scroll To Top