जव्हार : विविध मागण्यांसाठी माकपच्या किसान सभेच्या वतीने रास्ता रोको

0
14
IMG-20180610-WA0196राजतंत्र न्युज नेटवर्क
              जव्हार. दि. १० : शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी आणि डिझेल, पेट्रोलच्या वाढत्या दाराविरोधात आज रविवारी माकपच्या किसान सभेच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. जव्हार शहराला जोडणाऱ्या सिल्वासा आणि नाशिक अश्या महत्वाच्या नाक्यांवर किसान सभेच्या वतीने ७ ते ११ असा तब्ब्ल ४ तास हा रास्ता रोको करण्यात आला.
            किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या वनजमिनीशी संबंधित रखडलेल्या फाईली वटवणे, वनजमिनीच्या वाढीव क्षेत्राची पुन्हा मोजणी करा, वन जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्या, वन विभागाकडून शेतकऱ्यांना होत असलेला त्रास बंद करा, तसेच कॉ शंकरराव दानव यांच्या नेतृत्वाखाली स्वामीनाथ आयोगाची शिपरस लागू करा, आदी मागण्यांसह पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या दाराविरोधात माकपचे जिल्हा परिषद सदस्य रिटर्न बुधर यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला होता. या रास्तारोको करण्यात आला. या रास्तारोको करण्यात आला. या रास्तारोको पंचायत समिती सदस्य, लक्ष्मण जाधव, यशवंत घाटाला, जिल्हा कमिटी सदस्य शिवराम बुधर, कॉ. विजय शिंदे, यशवंत बुधर, सुरेश बुधर यांच्यासह जव्हार व मोखाड्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
Print Friendly, PDF & Email

comments