दिनांक 21 October 2018 वेळ 8:04 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनोर : वेढी ग्रामपंचयतीमार्फत शिलाई मशीन व सायकल वाटप.

मनोर : वेढी ग्रामपंचयतीमार्फत शिलाई मशीन व सायकल वाटप.

FB_IMG_1528631626489FB_IMG_1528631659123
प्रतिनिधी 
         मनोर, दि. १० : वेढी गावात गरजू महिलांना शिलाई मशीन आणि विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम सरपंच उषा पाटील यांच्या हस्ते नुकताच ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला.
         वेढी मांजुर्ली ग्रामपंचायतीने सेस फंडातून 14 शिलाई मशीन आणि 11 सायकल खरेदी केल्या व गावातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या गरजू महिलांना शिलाई मशीन  आणि विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्याने त्यांना रोजगार मिळेल आणि त्या स्वयंपूर्ण होतील. असे सरपंच उषा पाटील यांनी सांगितले. यानंतर गरजूना घरघंटी, पापड बनवणारे यंत्र आणि मिरची दळणारे डंक उपलब्ध करून देण्याचा मानस त्यानी यावेळी व्यक्त केला.
           यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर सुतार, मनस्वी शेलार, पोलीस पाटील वैभवी शेलार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top