दिनांक 19 February 2019 वेळ 4:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » चार वर्षानंतर पहिल्यांदाच खासदार कपिल पाटील मतदारांच्या भेटीला

चार वर्षानंतर पहिल्यांदाच खासदार कपिल पाटील मतदारांच्या भेटीला

downloadप्रतिनिधी .,
            कुडूस, दि. ०७ : भिवंडी ग्रामीण लोकसभा क्ष्रेत्राचे खासदार चार वर्षानंतर पहिल्यांदाच मतदारांना भेटण्यासाठी आल्याने कुडूस विभागात खासदारांच्या येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या या भेटीत चर्चा रंगली आहे.
            भिवंडी ग्रामीण लोकसभेचे खासदार कपील पाटील यांनी आज वाडा तालुक्यातील कुडूस विभागातील समाविष्ट गावांना भेटी देवून तेथील कार्यकर्ते व मतदार यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी नागरिकांनी आपल्या गावातील समस्यांचा पाढा वाचला. कुडूस येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, वाडा ग्रामीण रूग्णालयात शववाहीनी गाडी उपलब्ध करून देण्यात यावी, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपु-या सुविधा दूर कराव्यात, वाडा येथे अग्नीशमन यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, तसेच या क्षेत्रातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली असून कुडूस चिंचघर गौरापूर या रस्त्याचे काम दर्जाहिनअसल्याचे निदर्शनास आणून देतानाच याबाबत ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करण्यहात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
             या भेटीत निंबवली, केळठण, चांबळे, घोणसई, मेट, मुसारणे, चिंचघर, डोंगस्ते, सापरोंडे, मांगाठणे कोंढले आदी गावांना भेटी देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र पाटील यांनी निवडणूकीच्या तोंडावर ही धावती भेट घेतल्याने येथील काॅग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुस्तफा मेमन यांनी या भेटीवर उपरोक्त प्रतिक्रिया केली आहे. मागील चार वर्षे गायब असलेल्या खासदारांना आता मतदारांची आठवण झाल्याने या धावत्या भेटीतून ते मतदारांना आश्वासनांचे गाजर देवून गेलेत. चार वर्षात एकही काम केले नाही आता एका वर्षात काय सोडविणार समस्या? असे मेमन म्हणाले.
          यावेळी खा. पाटील यांच्यासह बाबजी काठोले, विभागीय चिटणीस योगेश पाटील, जिल्हा परिषद पालघर महिला व बालकल्याण सभापती धनश्री चौधरी, तालुका अध्यक्ष संदीप पवार, सरचिटणीस मंगेश पाटील, युवाचे अध्यक्ष दिनेश पाटील, उपसभापती जगन्नाथ पाटील, भगवान चौधरी व अंकीता दुबेले आदि कार्यकर्ते होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top