दिनांक 19 February 2019 वेळ 5:02 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दहावीचा आज निकाल

दहावीचा आज निकाल

LOGO-4-Onlineमुंबई / वृत्तसंस्था
              महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे यावर्षी घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर होणार आहे. निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (८ जून ) दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिला.
ऑनलाईन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणतपासणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. त्यावरील अर्जाची प्रत काढून ते भरता येणार आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह शनिवार (९ जून ) ते (१८ जून ) पर्यंत शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. छायाप्रतिसाठी शनिवार शनिवार ९ जून ते २८ जूनपर्यंत शुल्क जमा करून अर्ज करता येईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top