दिनांक 19 May 2019 वेळ 9:48 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » मनोरला मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन.

मनोरला मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन.

20180606_191000राजतंत्र न्यु नेटवर्क
            मनोर, दि. ७ : मानवाधिकार मिशन या संस्थेमार्फत मनोरच्या अली अल्लाना शाळेच्या पटांगणात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
          मुस्लिम धर्मात विशेष महत्व असलेला आणि पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदया आधी न्याहारी करून सूर्यास्तापर्यंत दिवसभर निर्जला(रोजा) उपवास करतात. या महिन्याचे महत्व जाणून मनोरमधील हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा, बंधुभाव वाढावा. याकरिता या इफ्तार मेजवानीच आयोजन केल्याचे मानवाधिकार मिशन चे महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश घोलप यांनी सांगितले. तसेच असा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी जमलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र बसून खाद्यपदार्थांवर ताव मारला.
          यावेळी मनोरचे उपसरपंच कैफ राईस, ग्रामपंचायत सदस्य नितीन भोई, माजी उपसरपंच मोमेज रईस, सईद खतीब, मानवाधिकार मिशनचे नारायण सवरा, समाजसेवक प्रशांत घोसाळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील, आसिफ मेमन, संजू मळेकर, राजेंद्र एडवनकर, रुपेश घरत, समीर मुल्ला आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top