दिनांक 21 July 2019 वेळ 5:29 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » महिलांविषयक कायदे शिबीर संपन्न

महिलांविषयक कायदे शिबीर संपन्न

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
दि. ०६ : सख्य महिला मार्गदर्शन केंद्राच्या वतीने काल, मंगळवारी पालघर पोलीस स्टेशनमध्ये महिलांविषयक कायदे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून केंद्राच्या डायरेक्टर रेजिना मिनेजीस व त्यांच्या सहकार्यांनी महिलांविषयक नवनवीन कायद्यांची परिपूर्ण माहिती उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना दिली.
काल सकाळी १० ते १२.३० वाजेदरम्यान हे शिबीर घेण्यात आले. शिबिरास पालघरचे सहाय्य्क पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निमित्त गोयल, पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, तसेच पालघर उपविभागीय पुरुष व महिला पोलीस कर्मचारी हजर होते. शिबिरास  मुंबई  हायकोर्टाच्या वकील एडव्होकेट आयरिन यांनी महिला व पुरुष लिंगभेद, समाजात महिलांना मिळणारी दुय्य्म वागणूक. महिलांवर परंपरागत लादण्यात आलेली बंधने, हुंडाबळी, समाजात जगतांना महिलांच्या मनातील असुरक्षतितेची भावना, तसेच इतर अत्याचाराने पीडित महिलांना कोणत्या कायद्याने संरक्षण मिळून त्यांचे सबलीकरण होऊ शकते व त्यामुळे महिला समाजात मानाने मार्गदर्शन कश्या जगू शकतात याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी आभार प्रदर्शनात पोलीस निरीक्षक कबाडी यांनी अश्या प्रकारचे शिबीर दर ३ महिन्यांनी आयोजित करणं यात यावे,  त्यांस पालघर पोलीस ठाण्याकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. जेणेकरून महिलांविषयी नवनवीन कायद्याचे ज्ञान सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना अवगत कार्य येईल व महिलांना संरक्षण मिळून त्या समाजात पुरुषांच्या बरोबरीने मानाने जगू शकतील, असे मत व्यक्त केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top