दिनांक 19 May 2019 वेळ 10:26 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पेट्रोल पापाच्या मालकाकडे ५ ते ६ लाख रुपये लुटले

पेट्रोल पापाच्या मालकाकडे ५ ते ६ लाख रुपये लुटले

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
             पालघर, दि. ०६ : येथील पेट्रोल पंप मालकाकडे दिवसभरात पेट्रोल – डिझेलची विक्री करून जमा झालेली ५ ते ६ लाखांची रक्कम तीन दुचाकीवरून आलेल्या इसमांनी लुटून नेल्याची घटना घडली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर येथील एका पेट्रोल पंपाचे मालक ४ जून रोजी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजण्याच्या सुमारास दिवसभरात पेट्रोल-डिझेलची विक्री करून जमा झालेली ५ ते ६ लाख रुपयांची रक्कम रेक्झिनच्या ब्येगेत भरून दुचाकीवरून घराच्या दिशेने निघाले होते. यावेळी ३ दुचाकीवरून घराच्या दिशेने निघाले होते. यावेळी ३ दुचाकीवरून आलेल्या ६ इसमांनी त्यांना अडवले व त्यांच्या गळ्यातील ब्येग जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. याबाबर पेट्रोलपंप मालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३९५ व ३४१ कलमानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top