दिनांक 03 July 2020 वेळ 4:36 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जागतिक पर्यावरण दिनी स्थानिक भूमीपुत्रांचा पर्यावरण वाचवण्यासाठी एल्गार !

जागतिक पर्यावरण दिनी स्थानिक भूमीपुत्रांचा पर्यावरण वाचवण्यासाठी एल्गार !

20180605_131739प्रतिनिधी
         मनोर, दि. ०६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदिवासी एकता परिषद आणि भूमिपुत्र बचाव आंदोलन समिती मार्फत काल मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील टेन नाका येथे पर्यावरण संवर्धन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने स्थानिक भूमीपुत्रांचा पर्यावरण वाचवण्यासाठी एल्गार पुकारला होता.  
            ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण सभेत उपस्थित राहून भूमीपुत्रांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेना पक्ष आणि पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे भूमीपुत्रांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील अशी ग्वाही दिली. त्याच्यासोबत आमदार अमित घोडा, रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे, बालाजी किणीकर आणि पालघर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार श्रीनिवास वनगा, जगदीश धोडी, नीलम संखे, गोविंद पाटील उपस्थित होते.
             पर्यावरण दिनानिमित्त मनोरच्या हात नदी नजीकच्या मैदानातुन रॅली काढण्यात आली होती. यात शेकडो आदिवासी बांधव सहभागी  झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. प्रत्येकाच्या हातात झाडाचे रोपटं होतं. नदी वाचवा, नाले वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, वीज वाचवा, इंधन वाचवा आशा घोषणा देत रॅली टेन नाका येथे पोहोचली. आणि रॅली चे रूपांतर सभेत झाले. येथे अनेक मान्यवरांची भाषणे झाली. पालघरचे वनक्षेत्रपाल विशाल गोदडे यांनी वेगवेगळ्या स्थानिक झाडाची ५०० रोपं उपलब्ध करून दिली.
            बुलेट ट्रेन, मुंबई बडोदा एक्सप्रेस वे,वाढवण बंदर,अरवाना बंदर,सूर्या पाणीपुरवठा योजना रद्द करा.MMRDA आराखडाआणि सि.आर.झेड आराखडा रद्द करण्याचा संघर्ष तीव्र करा, बेकायदेशीरपणे सुरू असलेले जमिनीचे सर्वे आणि भूमिअधिग्रहण थांबवा, जंगलांची लूट थांबवा आणि आदिवासींचे पारंपरिक अधिकार कायम करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
          पालघर जिल्हयात होऊ घातलेले प्रकल्प पर्यावरणाचा ऱ्हास करणारे आहेत.पालघर जिल्हा आदिवासी उपयोजनेत मोडत असून ग्रामसभेत झालेले प्रकल्प विरोधी ठराव विचारात न घेता जमीन अधिग्रहणाची अधिसूचना काढण्यात आली आहे.या प्रकल्पामुळे अधिग्रहित होणाऱ्या जमिनिमुळे आदीवासी आणि स्थानिक भूमिपुत्र भूमिहीन होणार असून पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे.पर्यावरण वाचले तर माणूस वाचेल आणि आदिवासी वाचेल असे प्रतिपादन भूमिसेनचे अध्यक्ष काळूराम धोडदे यांनी केले. आज जागतिक पर्यावरण दिन असल्याने सकारात्मक आंदोलन करत सभेत सहभागी असणाऱ्यांना झाडाचं रोपटं देत आहोत. तसेच येणाऱ्या काळात या प्रकल्पविरोधात आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचे त्यांनी सांगितले.
           याप्रसंगी सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीचे रमाकांत पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे संतोष पावडे, पर्यावरण संघर्ष समिती चे समीर वर्तक, ब्रायन लोबो, शशीकांत सोनवणे, दत्ता करबट, राजू पांढरा, डॉ. सुनील पऱ्हाड, समीर मुल्ला, कीर्ती वरठा आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top