दिनांक 19 May 2019 वेळ 11:07 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » हलोली येथे पर्यावरण जनजागृती कार्यक्रम संपन्न

हलोली येथे पर्यावरण जनजागृती कार्यक्रम संपन्न

IMG-20180606-WA0076प्रतिनिधी  
             मनोर, दि. ०६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या दहिसर वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत हलोली येथे काल ५ जून रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

           ‘वृक्ष वल्ली आम्हा सगे सोयरे वन चरे,या उक्तीप्रमाणे झाडांचे संगोपन झाले पाहिजे.जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा संतुलन बिघडल्यामुळे त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. म्हणून पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे. याकामी आपण सर्वांनी भाग घेतला पाहिजे. असे वनक्षेत्रपाल राजेश सारणीकर यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनाकामी झाडे लावून ती जगवली पाहिजेत. तसेच आपल्या गावाशेजारील जंगलाचे संवरक्षण आपण केले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य जीवन सांबरे यांनी केले.
           यावेळी हलोली वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील,पोलीस पाटील तुषार सातवी, वनपाल साहेबराव खरे, वनरक्षक बी. एस. दळवी, ए. डी दळवी, एम. जि. मोरे,ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top