दिनांक 19 May 2019 वेळ 10:04 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जव्हार : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणविषयक जन जागृती व श्रमदान

जव्हार : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणविषयक जन जागृती व श्रमदान

IMG_20180605_155752प्रतिनिधी
जव्हार, दि. ०५ : दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
               याच उद्देशाने आज दिनांक ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथे वन व वन्यजीव संवर्धन संस्थेच्या वतीने पर्यावरण जनजाग्रुती व श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी सर्व महिला स्वयंसहायता बचत गटातील महिलांनी श्रमदान करून महिलांनी श्रमदान करून झाडे लागवड केली. यान निमित्त सामाजिक कार्यकर्ते गणेश बोराडे यांनी उपस्थित महिलांना पर्यावरणात झालेला बदल व त्यावरील उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच  मनोज कामडी यांनी महिलांना मोगरा , भाजीपाला लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले .व प्रमोद मौळे यांनी विविध व्यवसाय व बाजारपेठ या विषयी माहिती दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य यशोदा भोरे , वन व वन्यजीव संवर्धन संस्था जव्हार अध्यक्ष गणेश बोराडे , सामजिक कार्यकर्ते मनोज कामडी , रोहित गावित , अंकुश टोकरे , प्रमोद मौळे , खोडाळा शाखेचे दत्ता ठोंबरे , सूरज गवारी, सुकन्या गवारी, सूरज दिघे , इतर निसर्गमित्र ,  सर्व महिला बचत गट व ग्रामस्थ उपस्थित होते .

comments

About Rajtantra

Scroll To Top