दिनांक 19 June 2019 वेळ 9:02 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » सकारात्मक द्रुष्टीने केलेली शेती नेहमीच फायदेशीर ! कृषी उपसंचालक

सकारात्मक द्रुष्टीने केलेली शेती नेहमीच फायदेशीर ! कृषी उपसंचालक

IMG-20180604-WA0076प्रतिनिधी
              वाडा, दि. ४ :  बरेचसे शेतकरी शेती उत्पादन घेत असताना शेतीतून फायदा मिळतच नाही हा नकारात्मक द्रुष्टीकोन घेऊन शेती करीत असतात, आणि शेती परवडत नाही असा बोभाटा मारतात. मात्र जे शेतकरी सकारात्मक द्रुष्टीने शेती करतात त्यांची शेती फायदेशीरच ठरली आहे. असे प्रतिपादन क्रूषि उपसंचालक सुरेश भालेराव यांनी उन्नत शेती सम्रुध्द शेतकरी या कार्यक्रमात केले.
              उन्नत शेती सम्रुध्द शेतकरी हा पंधरवडा सद्या राज्यभर सुरु असुन या कार्यक्रमांतर्गत वाड्यातील खरीवली व विक्रमगडमधील औंदे येथे आज, सोमवारी शेतकऱ्यांना खरिप हंगामातील पिके, विशेषता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या भातशेती बाबत क्रुषि अधिका-यांकडुन मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी फक्त उत्पादकाचीच भुमिका न निभावता प्रत्यक्ष विक्रेता होण्याची गरज आहे. या भागातील ‘वाडा कोलम’ सारख्या तांदळाला देशभर मोठी मागणी आहे. आपल्याकडे मुंबई सारखी मोठी बाजारपेठ आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही क्रुषि उपसंचालक सुरेश भालेराव यांनी यावेळी केले.
            नवनवीन येणाऱ्या बियाणांचा वापर करून तसेच प्रयोगशील शेती करून त्याला आधुनिकतेची जोड द्यावी व आपले उत्पन्न दुप्पट कसे करता येईल याकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रविण गवांदे यांनी केले.
           ओंदे  व खरिवली येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जिल्हा क्रुषि अधिक्षक काशिनाथ करकटे, विक्रमगड पंचायत समितीचे सभापती मधुकर खुताडे, तालुका क्रुषि अधिकारी डी.एन. ढेंबरे,बी.बी.वारे,पर्यवेक्षक आर.जी.घुडे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top