दिनांक 26 May 2020 वेळ 9:18 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जव्हार : कावेरी महिला ग्रामसंघाच्या पोयशेत येथील कार्यालयाचे उद्घाटन

जव्हार : कावेरी महिला ग्रामसंघाच्या पोयशेत येथील कार्यालयाचे उद्घाटन

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील हिरडपाडा प्रभागातील पोयशेत येथे महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत (उमेद) कावेरी महिला ग्रामसंघा ची स्थापना करण्यात आली असून या ग्रामसंघाच्या  कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले.  ग्रामीण भागातील गरीब वंचित महिलांना  उपजीविकेचे साधन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवून तालुक्यातील एकूण ५० ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसंघ स्थापन करण्यात आले आहेत.   
हिरडपाडा ग्रामपंचातीचे सरपंच माधव भोये यांच्या हस्ते या कार्यालयाचे व शेतीसाठी लागणाऱ्या विविध अवजारांचे उद्दघाटन करण्यात आले. यावेळी उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक सतीश सोनावणे, तालुका व्यवस्थापक  धनंजय वायदंडे, प्रभाग समन्वयक  मनोज कामडी, आरोहण संस्थेच्या प्रकल्प अधिकारी माधुरीमुकणे. मीनाक्षी खिरारी ,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक लहू गवळी, ग्रामस्थ गणपत पवार, सदाशिव पवार आदी उपस्थित होते. .ह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कावेरी महिला, ग्रामसंघ पदाधिकारी, महिलाबचत गट व जलतरंग मित्र मंडळाने यांनी मेहनत घेतली, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सरिता चौधरी यांनी केले

 

comments

About Rajtantra

Scroll To Top