दिनांक 21 January 2020 वेळ 4:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्थांकडून वाहनांवर दगडफेक व तोडफोड

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्थांकडून वाहनांवर दगडफेक व तोडफोड

IMG-20180604-WA0017वार्ताहर
             बोईसर, दि. ०४ : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांना जाणूनबुजून डावलले जात असल्याच्या भावनेतून आज, सोमवारी परिसरातील तरुणांनी पंचमार्ग येथील रस्त्यावर बसून आंदोलन केला. यावेळी संयमाचा बांध फुटलेल्या तरुणांनी अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या बसेसवर दगडफेक करत तोडफोड केली. यात काही कामगार किरकोळ जखमी झाल्याचे कळते.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात नोकर भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत स्थानिक तरुणांसह अन्य जिल्ह्यातील व राज्यातील तरुणांनीदेखील परीक्षा दिली होती. मात्र ह्या लेखी प्रिक्सहेत ४०० स्थानिक उमेदवारांपैकी केवळ ४ जण उत्तीर्ण झाल्याने या बी हबर्टी प्रक्रियेत हाही काळेबेरे असल्याचा संशय तरुणांमध्ये बळावला होता. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या केलेल्या पुनर्वसनामध्ये पुरेशा नागरी सुविधांची कमतरता असल्याने आधीच नाराज असलेल्या व आता प्रकल्पात नोकऱ्या देखील मॉल्ट नसल्याने या बेरोजगार तरुणांचा अखेर आज संयम सुटला. व त्यांनी पंचमार्ग रस्त्यावर तहान मांडून आंदोलन केले. यावेळी संतप्त आंदोलन कर्त्यांनी प्रकल्पाच्या बसेसवर तुफान द्गडफेडक करत तोडफोड केली
            आमच्या अर्जावरील केवळ स्थानिक पत्ता पाहून आम्हाला नोकरभरतीत डावलले जाते. दरवेळी आंदोलन करून समेट करताना तोंडाला पण ए पुसली जातात, हि निवड परीक्षा परत घ्यावी, अशी मागणी येथील तरुणांनी केली आहे. दरम्यान हा तिढा सोडवण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी फत्तेसिंह पाटील यांनी आंदोलन कर्त्यांना तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या व यवस्थापकांसोबत संयुक्त बैठक घेण्यास राजी केले असून या बैठकीस आमदार अमित घोडाही उपस्थित रहाणार आहेत. 

comments

About Rajtantra

Scroll To Top