दिनांक 24 February 2020 वेळ 7:35 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » कोकण पदवीधर मतदार संघातून सुवर्णा पाटील रिंगणात. 

कोकण पदवीधर मतदार संघातून सुवर्णा पाटील रिंगणात. 

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
कुडूस, दि. ०३ : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी राजकीय संघटन समितीच्या वतीने कोकण पदवीधर मतदार संघासाठी सुवर्णा पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘आमचा उमेदवार, आमची मते ‘हा फार्युला वापरण्यात येणार आहे.
            कोकणात कुणबी समाजातील पदवीधर तरूण मोठ्या संख्येने आहे. मात्र आजवर समाज सर्वच बाबतीत उपेक्षित राहिला आहे. याची दखल घेवून कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या वतीने पालघर ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पदवीधर नोंदणी कार्यक्रम राबविला. सुशिक्षित बेरोजगार तरूणांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे आता कुणबी समाजाच्या वतीने उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभा केला आहे. मे महिन्यात झालेल्या संघ कार्यालयातील राजकीय संघटन समितीच्या बैठकीत सर्वानुमते सुवर्णा पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. प्रथमच कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक संघाच्या माध्यमातून लढविली जात आहे. आपली शक्ती आणि एकीचे दर्शन यातून समाज घडविणार आहे.
              येत्या 25 जून 2018 रोजी कोकण पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. संघाने दिलेल्या उमेदवारामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. आज पर्यंत प्रस्थापित व्यवस्थेने कधीही समाजाच्या उमेदवाराला संधी दिली नाही. मात्र आता सुशिक्षित तरूण वर्ग पेटून उठला आहे. या साठी कोकणातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कंबर कसून प्रचार सुरू केला आहे. उमेदवार सुवर्णा पाटील  (भोईर) या उच्च शिक्षित असून महानगर पालिकेचे अधिकारीपद भूषविले आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य आहे. ठाणे जिल्हा परिषद, गाव,तालुका पातळीवरील अनेक प्रश्न शासकीय पातळीवर मांडून सोडविले आहेत. प्रशासन पातळीवर न्याय मिळवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. या बाबींचा विचार करून त्यांना ही उमेदवारी दिली आहे. सामाजिक भान व शान राखण्यासाठी सर्व पदवीधर मतदार त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील असा संघाला विश्वास संघातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धिपत्रकातून व्यक्त करण्यात आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top