जव्हारमधील आदिवासी कुटुंबातील कल्पेश जाधवचे राज्यसेवा परीक्षेत यश 

0
3
IMG-20180602-WA0050प्रतिनिधी 
जव्हार, दि. ०३ : पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यात रहाणाऱ्या कल्पेश जाधवने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मोठे यश मिळवीत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच तो यंदाच्या राज्यसेवा परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांमधील सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला असून वयाच्या २१ व्य वर्षी क्लासवन अधिकारी झाला आहे.
           कल्पेशची घरची परिस्थिती तशी अगदी बेताचीच आहे. अाई-वडिल दाेघेही निरक्षर असून, माेलमजुरी करुन अापला संसार चालवतात. त्यांचा दुसरा मुलगा म्हणजेच कल्पेशचा माेठा भाऊ पोलीस काॅन्स्टेबल आहे. कल्पेशचे ४ थी पर्यंतचे शिक्षण खडकीपाडा येथील  जि.प. शाळेत माध्यमिक शिक्षण कावळे आदिवासी आश्रम शाळेत तर बोर्डाच्या कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेतून १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतलेे. पुढे कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयातून गणित विषय घेवून त्याने बीएस्सी पदवी संपादन केली. पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण असतांना एमपीएससी स्पर्धा परीक्षांची काश त्याने धरली होती, विशेष म्हणजे घरची परिस्थीती अगदी बेताचीच असल्यामुळे कोणतीही शिकवणी किंवा कोणाचे मार्गदर्शन घेणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे केवळ यु ट्यूबवर व्हिडियो पाहून व वृत्तपत्रे वाचून त्याने पहिल्याच प्रयत्नात या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. कल्पेश आता राज्य शासनाच्या कोशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजू होणार आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबात व गावात आनंदाचे वातावरण आहे. कल्पेशच्या या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Print Friendly, PDF & Email

comments