दिनांक 19 May 2019 वेळ 9:48 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पर्यावरण रक्षणासाठी “सायकल सवारी” 

पर्यावरण रक्षणासाठी “सायकल सवारी” 

IMG-20180603-WA0004राजतंत्र न्यु नेटवर्क 
           पालघर, दि. ३: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालघर तालुक्यातील माकुणसार, मथाणे, केळवे आणि माहिम परिसरातील तरुणांनी “सह्याद्री मित्र संस्थेच्या” पुढाकाराने पर्यावरण रक्षणासाठी व निरोगी आरोग्याच्या हेतूने “सायकल सवारी” द्वारे जनजागृती केली. या रॅलीला  परिसरातील शालेय आणि महाविद्यालयिन विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांचा भरपूर प्रतिसाद लाभला.
            सुसाट वेगात पळणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या धबडग्यात सायकली अभावानेच दिसतात. सायकलमुळे इंधनाची बचत होतेच, शिवाय प्रदूषणही होत नसले तरी आता सायकली फारशा दिसत नाही. याचाच विचार करत सायकल वापराच्या प्रचारार्थ आणि अनुषंगाने पर्यावरण, निसर्ग, इंधन बचत, जलसंवर्धन आणि दुर्गसंवर्धन ईत्यादींची प्रबोधन करणारी “सायकल सवारी” परिसरातील जनमानसात लक्षवेधी ठरली.
           “सायकल चालवा, प्रदूषण टाळा”, “सायकल चालवा.. पेट्रोल वाचवा..”, “इंधन नको,  प्रदूषण नाही… सायकल सारखे वाहन नाही…”, “पर्यावरण टिकवा.. वसुंधरा वाचवा” असे विविध प्रकारची घोषवाक्य असलेली पोस्टर्स सायकलवर लावून ५५ सायकलस्वारांनी सायकल सवारीत भाग घेतला.
            कार्यक्रमासाठी सह्याद्री मित्र संस्थेचे दीपक पाटील आणि राजेश वैद्य यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माकुणसारचे सरपंच जयंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते नागेश वर्तक, राकेश पाटील, निकेश पाटील, गौरव राऊत, अरविंद पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. सायकल रॅलीमध्ये दरवर्षी आवर्जून सहभागी होणारे ज्येष्ठ नागरिक भगवान पाटील आणि अशोक पटेल यांचा  सन्मान करण्यात आला.

comments

About Rajtantra

Scroll To Top