दिनांक 23 October 2018 वेळ 7:21 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर : ड्राय डे ला मद्यविक्री, एकावर गुन्हा दाखल, एक लाख रुपये किमतीचा मद्य साठा जप्त

पालघर : ड्राय डे ला मद्यविक्री, एकावर गुन्हा दाखल, एक लाख रुपये किमतीचा मद्य साठा जप्त

IMG-20180531-WA0051राजतंत्र न्यु नेटवर्क
           दि. ०१ : पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकालाच्या पार्शवभूमीवर का, गुरुवारी जिल्ह्यात ड्राय डे (मद्यविक्रीवर) बंदी घोषित केली असताना हा आदेश धुडकावून पालघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मद्यविक्री करणाऱ्या एका व ऐन शॉप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण १ लाख २ हजार रुपयाची विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली आहे. पालघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या चारोटी कत्तपाडा येथील एका घरात विना परवाना मद्यविक्री करणाऱ्या इसमाच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी ५० हजार रुपयांचा अवैध्य दारू साठा जप्त केला आहे. अशोक धर्मा कडू या इसमाच्या घरात अवैध्य रित्या दारू विक्री सुरु असल्याची माहिती कसा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज छापा मारून हि कारवाई केली. या प्रकरणी अशोक कडू याच्या विरोधात कसा पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top