दिनांक 19 June 2019 वेळ 8:13 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वाडा कंपनी स्फोट : नुकसान भरपाईच्या आश्वसनानंतर मृतदेह घेतला ताब्यात

वाडा कंपनी स्फोट : नुकसान भरपाईच्या आश्वसनानंतर मृतदेह घेतला ताब्यात

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
           वाडा, दि. ०१ : तालुक्यातील कांबारे गावाजवळ असलेल्या तोरणे गावातील तोरणे इस्पात उद्योग प्रा.लि. या कंपनीत बुधवारी दि. ३० मी रोजी लोखंड वितळविण्याच्या प्रक्रियेदरम्यान स्फोट झाल्याने तीन मजुर जागीच ठार झाले होते मात्र यात गंभीर जखमी झालेल्या विनोद यादव याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र या घटनेनंतर नुकसान भरपाई देण्यास कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत विनोद यादव याच्या नातेवाईकांनी तब्बल तीन दिवस मृतदेह स्विकारण्यास नकार दिला अखेर आज कंपनी प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर यावर तोडगा निघाल्याने कुटुंबीयांनी तब्ब्ल ३ दिवसानंतर मृतदेह ताब्यात घेतला. 
           मृत्यू झालेल्या कामगारात तिघे जण अविवाहित होते तर विनोद यादव या विवाहित कामगाराचा पत्नी, 3 मुलं व आईवडील असा परिवार गोरखपूर येथे आहे . या घटनेनंतर कंपनी विनोद यादवच्या कुटुंबियांना काहीतरी नुकसान भरपाई देईल, अशी अपेक्षा होती.  मात्र व्यवस्थापन कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास त्याचे   नातेवाईक तयार नव्हते. शुक्रवारी अखेर कंपनी मालक व नातेवाईक यांच्यात तोडगा निघाल्याने या मृतदेहांना ताब्यात घेण्यास नातेवाईक तयार झाले व हा पेच तसेच मृतांची अवहेलना यातून सुटका झाली.

comments

About Rajtantra

Scroll To Top