दिनांक 19 June 2019 वेळ 8:24 PM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » बारावीच्या परीक्षेत पालघर जिल्ह्यातील ८७.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण !

बारावीच्या परीक्षेत पालघर जिल्ह्यातील ८७.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण !

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
             पालघर, दि. ३० राज्य माध्यमिक आणि उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ विचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा ८८.४१ टक्के इतका तर जिल्ह्याचा ८६.७० टक्के निकाल लागला आहे. यंदा देखील राज्यासह पालघर जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे.
राज्यात एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांपेकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पालघर जिल्ह्यातून एकूण ३९ हजार ४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यासह जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली असून जिल्ह्यात ९० टक्के मुली तर ८४ टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. तालुकानिहाय आकडेवारीनुसार वाडा तालुक्याचा निकाल ८६.२५ टक्के, मोखाडा ७४.९० टक्के, विक्रमगड ८०.५३ टक्के, जव्हार ७६.२८ टक्के, तलासरी ८८.४४ टक्के, डहाणू ८५.०५ टक्के, पालघर ८५.५४ टक्के तर वसई तालुक्याचा निकाल ८८.७८ टक्के इतका लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचे ९३.९३ टक्के, कला शाखेचे ७७.५५ टक्के, आणि वाणिज्य शाखेचे ८७.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ८५ टक्के विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती निलेश गंधे, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी पुढील उज्जवल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला आत्मविस्वास न गमावता यशाच्या दिशेने वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top