दिनांक 19 June 2019 वेळ 9:00 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » डहाणू तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघाच्या नविन कार्यालयाचे उद्घाटन

डहाणू तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघाच्या नविन कार्यालयाचे उद्घाटन

IMG-20180529-WA0141प्रतिनिधी
            डहाणू, दि. ३० : डहाणूत सेवा निवृत्त कर्मचारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघाच्या डहाणूतील स्वतःच्या वास्तूत उभारण्यात आलेल्या नवीन  कार्यालयाचा उद्घाटन समारंभ निवृत्त संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पेंशनर्स असोसिएशन पुणेचे सरचिटणीस श्री. लक्ष्मण टेंबे, शिक्षण तज्ञ मुंबई प्रा. देवराव पाटील, डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे कार्यवाह श्री. कृष्णकांत पोंदा, तसेच संघाचे उपाध्यक्ष श्री भालचंद्र चुरी, संघाचे सरचिटणीस श्री. बाबुराव देवकर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
            कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, स्वागत गीत आणि पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. संघाच्या नविन कार्यालयाचे उद्घाटन लक्ष्मण टेंबे यांच्या हस्ते  करण्यात आले.  निवृत्त कर्मचा-यांनी आनंदी जीवन जगावे, असा सल्ला देतानाच शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांचा मागोवा त्यांनी यावेळी घेतला. तर अध्यक्ष पदावरून बोलताना मारुती वाघमारे यांनी संघटनेच्या वाटचाली विषयी सविस्तर माहिती दिली आणि सेवा निवृत्त कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांबाबत विशेषतः गट विमा, निवड श्रेणी याबाबत संघटने मार्फत होत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. यानिमित्ताने त्यांनी आपल्या मातोश्री कै. लक्ष्मीबाई भिकाजी वाघमारे यांचे स्मरणार्थ रक्कम रुपये ११ हजार १११रुपयाचा धनादेश आपल्या पत्नी सौ. सुशिला वाघमारे यांच्या हस्ते संस्थेचे सरचिटणीस देवकर यांच्या कडे सुपूर्द केला.
             या प्रसंगी वयाचे ७५ वर्षे पूर्ण केलेल्या तालुक्यातील ३९ सेवा निवृत्त कर्मचा-यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आशागडचे दशरथ तामोरे, बाडापोखरणचे शीवराम राऊत,  बोर्डीचे अनंत पाटील  यांना २०१७-१८ चे उत्कृष्ट सेवा निवृत्त कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले. अनंत पाटील लिखित ‘ अंतरंग ‘ या आत्मचरित्राचे प्रकाशन प्रा. देवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुस्तकाच्या विक्रीतून प्राप्त होणारी सर्व रक्कम संघाला देणगी म्हणून देण्याचे अनंत पाटील यांनी जाहीर केले. कार्यक्रमास तालुक्यातील ७ विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश राऊत व सौ. अर्चना राऊत यांनी केले. संघाचे सह सचिव हेमंत राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

comments

About Rajtantra

Scroll To Top