दिनांक 20 January 2019 वेळ 9:03 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » आयपीएलवर सट्टा, बोईसरमध्ये चौघे ताब्यात

आयपीएलवर सट्टा, बोईसरमध्ये चौघे ताब्यात

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
दि. २४ आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या बोईसरमधील ४ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह ४६ हजारांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बोईसर परिसरातील काही तरुण आयपीएलच्या मॅचेसवर सट्टा लावत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी २२ मे रोजी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास सदर ठिकाणी छापा मारला असता ४ तरुण मोबाईल फोनद्वारे आयपीएल मॅचवर सट्टा लावताना आढळून आले. या चारही तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top