शिवसेनेकडून वनगा कुटुंबियांच्या अश्रुंचे भांडवल – मुख्यमंत्री

0
15
IMG-20180524-WA0157प्रतिनिधी  
            जव्हार, दि. २४ : पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजप ने प्रतिष्ठेची केली असून,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरुवारी येथील राजीव गांधी स्टेडियम येथे जाहीर सभा घेत  श्रीनिवास वनगाच्या उमेदवारीवरून शिवसेनेवर तोफ डागली.
              यावेळी मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले कि, बाळासाहेबांची  शिवसेना समोरून लढणारी होती. मात्र सध्याची पाठीत वार करणारी ही कोणती सेना? असा सवाल मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना करीत दिवंगत वंनगांच्या मृत्यू नंतर मी स्वताःहा उद्धव आणि सुभाष देसाई यांना फोन वरून आम्ही श्रीनिवासलाच उमेदवारी देणार आहोत, तुम्ही सहकार्य करा, असे सांगितले व ह्याला त्यांनी होकारही दिला. मात्र नंतर शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, असे मुख्यमंत्री म्हणाले. ख-या अर्थानं कुटुंबाला आधार आम्ही दिला. कारण वनगाच्या मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू दिसण्यासाठी शिवसेनेला ३ मे ची वाट का पहावी लागली. तेव्हा उद्धव ठाकरे कुठे  होते. असा सवालही त्यांनी केला. शिवसेनेने वनगांचे अश्रुंचे भांडवल केले आहे. त्यामुळे आदिवासी जनता त्यांना माफ करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 तसेच आदिवासींना न्याय मिळवून देणारे कमळाचे फुलच आहे. त्यामुळे पालघर जिह्यातील जनतेला भाजपा शिवाय पर्याय नसून जनतेची साथ आम्हाला आहे.
          ते पुढे म्हणाले, आम्ही गरिबांसाठी वन जमिनीचा कायदा तयार केला आहे. त्यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातील आदिवासींना वनजमीन मालकी हक्कपट्टा देणार आहोत. त्यांच्या वनपट्टेसाठी समृद्धी विकास शेतीसाठी जल आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती व भाजी लागवड करून या भागातील स्थलांतर थांबेल. पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरिब मागासवर्गीय कुटुंबांना घरकुल योजने मार्फत घरकुले देण्यात आली आहेत. तसेच स्वच्छ अभियाना अंतर्गत महाराष्ट्रात ३ वर्षात ६० लाख शौचालये बांधली आहेत. म्हणूनच पालघर जिल्हा शौचालय मुक्त झाला आहे. तसेच उज्वला गॅस कनेक्शन योजनेतून जिल्ह्यात २२ हजार कुटुंबांना उज्वला गॅस कनेक्शन दिले. तसेच जव्हार, मोखाडा, आदिवासी भागात विजेचा लपंडावसुरु होता . विजेचा हा प्रश्न आता सुटला असून, प्रत्येक घरा-घरापर्यंत वीज पोहचली आहे. असा दावा करतानाच त्यामुळे आदिवासींना न्याय देणारे कमळाचे फुलच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
          जव्हार, मोखाड्यातील गरोदर आदिवासी महिलांसाठी बालविकास प्रकल्पा मार्फत योजना सुरु करून या भागातील कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न करू. तसेच ठाणे जिल्ह्याचे विभाजनामुळे आदिवासींच्या विकासासाठी पालघर जिल्हा असला तरीही जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालघर जिल्हा अधिका-यांना आठवड्यातून दोन दिवस जव्हारच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात बसून या भागातील कामे याच ठिकाणी मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी
दिले.
         यावेळी बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे, केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, पास्कल धनारे, किसन कथोरे, यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी कार्यकर्तेव नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
निलेश सांबरे यांचा भाजपात प्रवेश
या पोटनिवडणुकीत सुरुवातीला भाजपाला पाठिंबा देणारे जिजाऊ संस्था आणि कोकण विकास मंचाचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सुरवातीला भाजपाला पाठींबा दिला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्तेसह भाजपात जाहीर प्रवेश केला.
Print Friendly, PDF & Email

comments