दिनांक 20 August 2019 वेळ 3:18 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जांभुळमाथा गावातील सर्वच विद्युत खांब सडले

जांभुळमाथा गावातील सर्वच विद्युत खांब सडले

IMG-20180523-WA0167प्रतिनिधी
जव्हार, दि. २३ : तालुक्यातील जांभुळमाथा गावातील संपूर्ण विद्युत खांब सडले असून, मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह दाखल होणाऱ्या पावसात ते पडून एखादी दुर्घटना होण्याचा संभव निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाळयातचहे खांब न बदलल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन जव्हार विद्युत महामंडळा लेखी निवेदन देखील दिले आहे. 
          जांभुळमाथा गावात दाभेरी येथील ट्रासफॉर्मरून  विद्युत पुरवठा करण्यात आला आहे.  यासाठी दाभेरी ते  जांभुळमाथ्यापर्यंत उभारण्यात आलेले १९ विद्युत खांब सडले आहेत. तर प्रत्येक खांबाचा खालील भाग सडून काही खांब वाकले देखील आहेत. त्यामुळे  हे विद्युत खांब कधीही घरांवर पडून मोठी दुर्घटना घडू शकते या भीतीखाली नागरिक आहेत. मागील महिन्यातच ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव घेऊन खांब बदलण्यासाठी विद्युत महामंडळाला निवेदन दिले आहे. मात्र मे महिना संपायला आला तरीही  याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सडलेले खांब बदलण्याचे काम मंजूर असल्याचे विद्द्युत महामंडळाकडून सांगण्यात येते. मात्र हे काम होणार तरी कधी? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
          पुढील पंधरा दिवसात विद्युतचे काम झाले नाही. तर ऐन पावसाळ्यात  ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ येईल? अशी भीती ग्रामस्थांना वाटायला लागली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच गावामधील धोकादायक विद्द्युत खांब खांब बदलावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top