दिनांक 20 January 2019 वेळ 8:44 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाळवंडा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी तिरंगी लढत, ९ पैकी ५ सदस्य बिनविरोध ४ सदस्यांसाठी होणार निवडणूक

वाळवंडा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी तिरंगी लढत, ९ पैकी ५ सदस्य बिनविरोध ४ सदस्यांसाठी होणार निवडणूक

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
           जव्हार. दि. २३ : आठ गावपाड्यांचा समावेश असलेल्या वाळवंडा ग्रामपंचायत निवडणूकीत थेट सरपंच पदासाठी ३ अर्ज दाखल झाले आहेत. तर ९ सदस्यांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असुन, उरलेल्या ४ जागांसाठी येत्या २७ मे रोजी मतदान होणार आहे. यामुळे वाळवंडा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहे.
           वाळवंडा ग्रामपंचायतमध्ये खंडीपाडा उंबरवांगण, वाळवंडा, गावठाण, सडकपाडा, खडकीपाडा, फणसपाडा, पलाटपाडा, आदी ८ पाड्यांचा समावेश असून ८५० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रंगतदार होणाऱ्या या निवडणुकीत सेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि सीपीएम हे पक्ष रिंगणात आहेत. तर एकीकडे लोकसभा तर दुसरीकडे वाळवंडा ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने तालुक्यातील सर्वच पक्षातील नेते मंडळीची चांगलीच धावपळ उडाली आहे. २७ मे ला मतदान होणाऱ्या या निवडणूकीची मतमोजणी २८ मे रोजी होणार  आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top