दिनांक 20 January 2019 वेळ 9:04 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मनोरच्या सायलेंट रिसॉर्टमधील तरण तलावात मलमिश्रीत दूषित पाणी.

मनोरच्या सायलेंट रिसॉर्टमधील तरण तलावात मलमिश्रीत दूषित पाणी.

IMG-20180522-WA0096प्रतिनिधी
           मनोर, दि. २३ : मनोरच्या सायलेंट रिसॉर्ट मधील तरण तलावात मानवी विष्ठा मिश्रित दूषित पाणी असल्याचा  धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत रिसॉर्ट वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मनसेचे विक्रमगड तालुका अध्यक्ष परेश रोडगे यांनी पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना  केली आहे.
            सध्या उन्हाळी सुट्टीचे दिवस आणि तापमानाचा पारा चढलेला असल्याने मनोर परिसरातील वैतरणा नदीकिनारी तरण तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या सायलेंट रिसॉर्ट मध्ये पालघर जिल्ह्यातील तसेच मुंबई आणि गुजरात राज्यातील पर्यटक गर्दी करतात. राजकीय नेतेआणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी हे रिसॉर्ट प्रसिद्ध आहे. सोमवारी (दि.21) तरणतलावाच्या मध्यभागी असलेल्या करंज्याच्या पायरीच्या आतील भागात मानवी विष्ठा असल्याचे मनसेचे परेश रोडगे यांच्या निदर्शनास आले. लहान मुलं तरण तलावात डुंबत असल्याने दूषित पाणी नाकातोंडात जात असते. सुरक्षा रक्षक आणि व्यवस्थपना च्या गलथान कारभारामुळे रिसॉर्ट मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर व्यवस्थापनाने त्यावर दुर्लक्ष करत, जास्त गर्दी असल्याने पर्यटकांच्या लक्षात येऊ नये म्हणून तरणतलावाची साफसफाई सायंकाळी करण्यात येईल असे सांगितले. याआधी मनसेचे आशिष मेस्त्री यांनी रिसॉर्ट मध्ये वापरलेले पाणी शुद्धीकरण यंत्रणा नसल्याबाबतची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात आली होती. याबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
            रिसॉर्ट मधील घडलेला हा प्रकार गंभीर असून पर्यटकांच्या आरोग्याबाबत हलगर्जी पणा करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करून सायलेंट रिसॉर्ट बंद करण्यात यावे अशी मागणी मनसे  तर्फे करण्यात आली आहे.
घडलेला प्रकार गंभीर नाही त्याचा गाजावाजा करण्यात येऊ नये.
दरदिवशी सायंकाळी तरण तलावातील पाणी शुद्ध केले जाते.
– विंफ्रेड लोबो,
व्यवस्थापक सायलेंट रिसॉर्ट, मनोर.)

comments

About Rajtantra

Scroll To Top