दिनांक 21 May 2019 वेळ 10:00 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » भाजपवाले मुंबईतील पाकिटमार सारखे फोटोमार-आमदार डॉ. नीलम गोऱ्हे*

भाजपवाले मुंबईतील पाकिटमार सारखे फोटोमार-आमदार डॉ. नीलम गोऱ्हे*

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यु नेटवर्क
             मनोर, दि. २३ : भाजपवाले मुंबईतील पाकिटमार सारखे फोटोमार असल्याची बोचरी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोरे यांनी केली.  पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूसाठी प्रचारदौऱ्यांवर आलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ नीलम गोऱ्हे यांनी तालुक्यातील गोवाडे गावात महिलांशी संवाद साधला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील,पंचायत समिती सदस्य श्रद्धा घरत, महिला आघाडीच्या ममता चेंबूरकर, ज्योती ठाकरे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
            दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे कार्य पुढे नेण्यासाठी श्रीनिवास वनगा याना उमेदवारी दिली असून वनगा कुटुंबियांसाठी मातोश्रीची दार कायमस्वरूपी उघडी राहतील असे त्या म्हणाल्या. भाजप वाले महानगर पालिकेच्या पहारेकर्यांच्या भूमिकेत होते ते आता कुणाच्या घरात काय चाललंय हे पाहणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा भूमिकेत आले आहेत. असे सांगतानाच विकासाचा अजेंडा घेऊन शिवसेना प्रचारात उतरली आहे असे त्या म्हणाल्या वनगांच्या फोटोच्या दुरुपयोगाबाबत बोलताना भाजपवाले मुंबईतील पाकिटमारासारखे फोटोमार झाले आहेत अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी स्थानिक महिलांचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
           दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या प्रतिमेचा भाजप मत मिळविण्यासाठी वापर करत असल्याने कुटुंबाला मनस्ताप होत आहे. उद्धव ठाकरेंनी आधार दिला त्याप्रकारे आपण मदत करून श्रीनिवास वनगा याना विजयी करावे असे आवाहन चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी यावेंळी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top