दिनांक 20 January 2019 वेळ 8:48 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार तालुक्यात पोलिस शिपाई ची कमतरता     

जव्हार तालुक्यात पोलिस शिपाई ची कमतरता     

IMG-20180519-WA0141प्रतिनिधी
जव्हार, दि. २० : जव्हार पोलीस स्टेशन हद्दीत ८८ पोलीस शिपाई पंद मंजूर आहेत. मात्र यातील पोलीस शिपायांची ४२ पदे रिक्त असल्याने ४६ पोलिसांवर जव्हार तालुक्याची जबाबदारी आहे. यात १ पोलीस निरीक्षक व २ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. या रिक्त पदांचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने रिक्त पदे तातडीनं ए भरण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
               जव्हार तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६० हजार  असून तालुक्यात १०९ महसूल गावे व २५३ पाडे आहेत. येथील लोकसंख्येच्या तुलनेत ८८ पोलीस शिपाई पदे मंजूर आहेत. मात्र त्यातील ४२ पदे रिक्त असल्याने तालुक्यातील लोकांची जबाबदारी केवळ ४६ पोलिसांवर आहे. जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील खांबाळा न्यहाळे हे दोन दूर क्षेत्र आहेत. तर जव्हार, खांबाळा, न्याहाळे, जामसार, तलासरी,वाळवंडा हे सहा बिट आहेत. मात्र पोलिसांच्या अनेक रिक्त पदांमुळे कायसा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. येथील पोलिसांना साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही कामे करावी लागत आहेत. रिक्त पदांमुळे पोलिसांवरील ताण तर वाढतोच आहे. शिवाय नागरिकांचीही कामे वेळेत होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
तालुक्याच्या ठिकाणी नेहमी पक्षांचे आणि विविध संघटनांचे मोर्चे, आंदोलन आणि रास्ता रोको असतो. जव्हार हे पर्यटनस्थळ असल्याने नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. त्यांचीही जबाबदारी पोलिसांवर असते. सोबतच वाद. भांडण- तंटे मिटविण्यासाठी पोलीस स्टेशनला रोजच गर्दी असते. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील रोजची बिट निहाय कामे पोलिसांना उरकावी लागत आहेत. त्यातच आठवड्यातून येणारे मंत्री, पुढारी, राजकारणी, अधिकारी वर्ग यांना सुरक्षा प्रदान करणे आदी कामांसाठी जव्हार पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई कर्मचारी कमी पडत आहेत. परिणामी इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर या कामाचा ताण वाढत आहे. हि परिस्थिती फाटा लवकरात लवकर हि पदे भरण्याची मागणी होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top